श्री दत्त पारायण सांगता

 नमस्कार,🙏

 श्री गुरुदेव दत्त


 उद्या दिनांक २२ आॅगस्ट  २०२०  शनिवार  रोजी आपण

 आपल्या श्रीदत्त पारायण संकल्पाची सांगता करणार आहोत.



सांगता करताना आपल्याला महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे, नैवेद्यात  वरण,भात,घेवड्याची भाजी(घेवडा नाही मिळाला तर बटाट्याची भाजीही चालेल)  पोळी आणि एक गोडाचा पदार्थ(शिरा,खीर,मोदक यांपैकी किंवा आपल्या ईच्छेनुसार कुठलाही एक गोड पदार्थ  ) असा नैवेद्य दाखवायचा आहे.उद्या गणेश चतुर्थी देखील आहे त्यामुळे जो नैवेद्य बाप्पाला केला असेल त्याच पदार्थांचा नैवेद्य महाराजांना दाखवला तरी हरकत नाही.




 संपूर्ण ५३ पर्यंतचे अध्याय पठण झाल्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवणे आणि आरती करणे,सिद्धमंगल स्तोत्राचे ११ वेळा पठण करणे ही सेवा उद्या   करायची आहे, सांगता करून होइपर्यंत अन्न  ग्रहण करू नये उपवास पदार्थ, फलाहार ,दुध वगैरे घेण्यास हरकत नाही.


सर्वांना ठाऊक असेलच परंतू आठवण म्हणून😊😊 

●नैवेद्य करताना कांदा लसूण वापरु नये.👍 

●बिना फोडणीचे वरण करावे.

●नैवेद्य दाखवताना शुध्द तुप घालावे आणि प्रत्येक पदार्थावर तुळशीचे पान ठेवावे.


सेवा झाली की ग्रुपमध्ये आत्ता पर्यंत आपण केलेल्या  श्री सिद्धमंगल स्तोत्र आणि श्री अघोरकष्टोधरण स्तोत्र पठणाची संख्या आपले नाव, हजेरी क्र. आणि श्री दत्त असे लिहून पाठवायचे आहे.


 श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये!!!



 🌸श्री दत्त पारायण संकल्प🌸