अध्याय - ३८

 ॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

अध्याय - ३८


बगलामुखी आराधना विवरण


आम्ही पीठिकापुरला जात असताना एक बैरागी भेटला. तो पिंपळाच्या झाडाखाली बसला होता. त्याचे डोळे फार तेजस्वी होते. आम्ही तेथे पोहोचताच तो म्हणाला, तुम्ही शंकरभट्ट व धर्मगुप्त आहात ना?'' आम्ही “हो' म्हणालो. त्यावर तो म्हणाला, “या झाडाखाली थोडी विश्रांती घ्या. तुमच्या जवळ श्रीपादांच्या चर्म पादुका आहेत ना?'' असे त्याने विचारताच आम्ही 'हो' म्हटले. तेव्हा तो म्हणाला, “त्या पादुका मला द्या व माझ्या जवळचा कालनागमणी तुम्ही स्वीकारा.'' आम्ही “हो' म्हटले.


मी त्यांना म्हणालो, “अहो! मी श्रीपादांचे दिव्य चरित्र लिहिण्याचा सकंल्प केला व मला त्यांच्या जीवनातील प्रत्येक वर्षात घडलेल्या एकेक घटना सांगणारे भक्त भेटत आहे. याचे काय कारण असेल हो?''


त्यावर ते बैरागी म्हणाले, “श्रीपाद आदिभैरवी-आदिभैरवाचे संयुक्त रूप आहे. कालशासक कालभैरव तेच! तेच कालस्वरूप, तेच कालपुरुष महाकालस्वरूप पण तेच! केंव्हा कुठली घटना घडावी हे त्यांना ठाऊक त्यामुळे श्रीपादांचे अव्यक्त संकल्प स्वरूप, देशकालात बंदी असलेल्या जीवाला समजणे शक्य नाही. देशकालाशी खेळणे हा त्यांचा चेंडूचा खेळच! जीवाच्या क्रमविकासात त्या त्या जीवाचे स्वभाव, त्याचे धर्म,कर्म,फल,प्रभाव,सर्व त्यांच्या स्वाधीन असते. महापंडित म्हणून अहंकाराचा तोरा मिरवणाच्यास, ते क्षणात अज्ञानी बनवतात व अत्यंत अज्ञानी असलेल्या माणसाला त्वरित वेदवेदांग जाणणारा महान पंडित बनवतात. त्यांचा योग संपन्न अवतार आहे. त्यांना अवतार पुरुष साक्षात् दत्त प्रभू म्हणून ओळखण्यासाठी किती तरी पापराशी दग्ध व्हायला हव्या, पुण्य राशीचे ढीगच्या-ढोग जमा व्हायला हवे. हा साधारण नियम आहे. परंतु त्यांच्या कृपा कटाक्षाने या साधारण नियमाच्या अतीत होऊन भक्तांचे रक्षण करीत असतात क्षणोक्षणी त्यांचा लीला विहार चालतो. श्रीपादांच्या चरितामृताचे अध्ययन करणा-यांचा क्रमबद्ध विकास होत असतो. म्हणूनच तुला त्यांच्या जीवनातील प्रत्येक वर्षांच्या एक किंवा दोन लीला सांगितल्या जात आहेत तेही क्रम बद्धतेने सांगणे, हा पण त्यांच्या लीलेचा अंतर्भागच आहे. ते फक्त या पृथ्वीच्या विकासासाठी अवतरले असे समजणे पण चुकीचे ठरेल. अनंत कोटी ब्रह्मांडात दर क्षणी सृष्टी - स्थिती लय होत असते. त्यातला क्रम विकास नेहमी त्यांच्याच हातात असतो. त्यांच्या दिव्य नेत्रात कोट्यांनुकोटी ब्रह्मांडाची वृद्धी व क्षय होत असते, हेच त्यांचे खरे तत्व. निराकार असणारे परतत्व अव्यक्तात कुठल्या स्थितीत आहे, हे न कळणारे महातत्व मानवी आकारात पीठिकापुरात अवतरणे, हीच एक दिव्य लीला आहे. मग अवतरल्यावर होणा-या लीलांचा अंत कुठे व किती हे कोण सांगणार! त्यांचे वर्णन करतांना वेद देखील मौन होतात. वेदज्ञान परिमित आहे, पण त्यांचे ज्ञान अनंत, त्यांची शक्ती अनंत, त्यांची करुणाही अनंत आहे. ते सर्व देशात सर्व काळात असतात. ते सत्याचे सत्य, ज्ञानाचे ज्ञान, अनंतात भरुन उरलेले आहेत.


बगलामुखी उपासना


नंतर तो बैरागी म्हणाला मी बंगाल प्रांतात राहणारा बगलामुखी देवीचा उपासक आहे. दशमहाविद्येतील ही एक देवी आहे. व्यष्टि रूपात शत्रुनाश करू इच्छिणारे, या देवीची आराधना करतात. समष्टि रूपात परमेश्वराची संहारशक्ती, पण बगलादेवीच. या देवीची आराधना केल्यास वाचासिद्धी लाभते. मनोवाक्काय कर्माने धर्मबद्ध जीवन जगणारे, बोलतील ते सत्य होते. वाचेचे पण परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी असे भेद आहेत.


एकदा सत्य युगात सर्व जगाचा नाश करणारे भयंकर वादळ आले. जीवांवरचे हे संकट पाहून विष्णू चिंताग्रस्त झाले होते. त्यांनी तप केले असता श्रीविद्या महादेवी बगलामुखी देवीस्वरूपात प्रकट झाली व तिने श्रीमन्नरायणाला दर्शन दिले. विध्वंस करणाच्या त्या वादळाला तिथल्या तिथेच स्तंभित केले. तिलाच वैष्णवी देवी पण म्हणतात. चतुर्दशीच्या मध्यरात्री मंगळवारी ही प्रकट झाली. ती स्तंभन शक्तिरूपिणी आहे. तिच्यामुळेच आदित्य मंडळ व स्वर्ग उभे आहे. ती ऐहिक व पारलौकिक सुख देऊ शकते. साधकाच्या जीवनात अस्तव्यस्तपणा आणणाच्या दुष्ट अंधार शक्तींचे स्तंभन करून ती साधकाच्या उन्नतीस अभय देते. तिला बगलामुखी, जातवेदमुखी, उल्कामुखी, ज्वालामुखी, बृहदभानुमुखी असेही म्हणतात. सर्व प्रथम ब्रह्मदेवानी, या बगलामुखी देवीची उपासना केली. तिरुमला येथे हिचेच बालरूप दर्शन ब्रह्मदेवांना झाले. तेंव्हा त्यांनी तिथेही तिची अर्चना केली होती. या मूर्तीची, वेंकटेश पद्मावती सह अर्चना करून ब्रह्मोत्सवाचा प्रारंभ करतात. हिच्या उपासनेने मिळालेल्या महाविद्येचा ब्रह्मदेवांनी सनकादिक महर्षीना उपदेश केला होता. ब्रह्मदेवानंतर बगलामुखीची उपासना करणारे विष्णू, नंतर परशुरामानेही हिची उपासना केली होती. मी तीर्थ यात्रा करीत पीठिकापुरला पोहोचलो. कुकुटेश्वराच्या देवळात जाऊन दर्शन घेतले. तिथे मी एक गोड सुंदर बालक बघितले.


ते बालक म्हणाले, “अरे तू बंगाल प्रांताचा आहेस ना? मी पुष्कळ वर्षापासून या देवळात स्वंयभू दत्त म्हणून बंदिस्त झालेलो आहे. मला फार उष्मा होत आहे. या पुजा-यांना शीतलोपचार करायला सांगितले, पण ते ऐकत नाही. “मी बाहेर निघून जाईन' असं म्हणालो तर ते म्हणाले, “आम्हीच तुला हाकलतो.'' मला बाहेर येऊन थोडेच दिवस झालेले आहेत. त्यांच्या बोलण्यातला गूढार्थ मला कळला. तो बालक साक्षात् दत्तप्रभू आहे मी ओळखले. दत्तप्रभूची पूजा श्रद्धाभक्तीने होत नाही हेही जाणवले. दत्तप्रभू अस्पृश्यता पाळत नाहीत. पण कर्मठ ब्राह्मण अस्पृश्यांना देवळात येऊ देत नसत. त्यामुळे अशा दीन दलितांची, आर्त लोकांची करुणा येऊन त्यांचे रक्षण करण्यासाठी ते स्वतः अवतरले हेही मी ओळखले.


मी त्यांना माझ्या दृष्य देवताच्या रूपात दर्शन देऊन मला धन्य करण्यास सांगितले. ते मंदहास्य करीत होते. तितक्यात मला बगलामुखी देवीचे दर्शन झाले. पण ते तेज माझ्या चर्मचक्षूना सहन झाले नाही, मी मूर्छित होऊन पडलो. तिथल्या काही लोकांनी मला झाडाखाली चटई टाकून झोपवले. खरे तर ती मूर्छा नव्हती, पण लोकांना तसे वाटत होते, त्यांनी मला ती ब्रह्मानंदानुभूती दिली होती. त्या दिव्य आनंदाचा अनुभव घेत मी आठ दिवस त्याच स्थितीत होतो. नाडी थांबली होती. हृदय ही थांबले होते.


बैराग्याची माहिती


माझ्याबद्दलची वार्ता पीठिकापुरात पसरली. कुण्या एका ब्राह्मण वैराग्याने कुकुटेश्वर देवळात प्रवेश केला. स्वयंभू दत्ताचे दर्शन घेतले. तो एक क्षुद्र मांत्रिक आहे. त्याने आपल्या यक्षिणी विद्येचा प्रयोग कुक्कुटेश्वर व स्वयंभू दत्तावर केला. पण पुजा-यांच्या नियम निष्ठेमुळे कुकुटेश्वराची व स्वयंभू दत्ताची शक्ती क्षीण न होता, उलट तो बैरागीच मूर्छित झाला. त्याची नाडी व हृदय थांबले आहे.


साधारणतः गावात अफवा एका क्षणात पसरतात. त्यात भर म्हणजे, गावातले लोक खन्याचे खोटे व खोट्याचे खरे करून सांगण्यात मोठे चतुर होते. त्याच चतुरामध्ये अवतरलेले श्रीपाद, त्यांच्याहूनही चतुर होते. इथे घडणाच्या घटना त्यांना विनोद पूर्ण वाटत, ते नित्य विनोदी व दिव्य विनोदी! या अफवांमुळे पुजा-यांचा मान फारच वाढला. त्यांच्या नियम निष्ठेने क्षुद्र मांत्रिक मेल्यासारखा मूर्छित होऊन पडला आहे. या पुजा-यांच्या आश्रयास गेल्यास समस्त अरिष्टे नाहीसे होतात. त्यांच्याकडून विशेष पूजा करवून घेतली, तर अधिक चांगले कल्याण होईल,असा जोरदार प्रचार सुरू झाला.


पुजा-यांकडून पूजा करवून घेण्याचे प्रमाण खूपच वाढले. त्यांना भरपूर दक्षिणा दिली जात होती. पण इतक्यात पुजा-यात खूप गोंधळ माजला. त्याचे कारण असे की पुजारी मोठ्या मेहनतीने कुक्कुटेश्वर व स्वंयभू दत्ताची पूजा करायचे. लोक निरनिराळ्या प्रकारचे दान व दक्षिणा द्यायचे. ते सर्व ते आपल्या घरात पेटीत जपून ठेवत, पण सकाळी उठून बघतात, तर ते सर्व अदृश्य झालेले असे. सगळ्यांच्या पूजा स्वीकारल्याने त्यांना पूजा तर करावीच लागे. पण मिळालेली दान दक्षिणा गायब होत असे. त्यांना फळफळावळ, अन्न धान्यही भरपूर मिळत असे. पण ते सर्व खाऊनही ते थकल्यासारखे होत. दिवसेंदिवस त्यांची अशक्तता वाढत होती. हे सर्वच त्यांना विचित्र वाटत होत. बरे, हे असे होत आहे, हेही ते कुणाला सांगू शकत नव्हते. त्यामुळे तेच संकटात पडले असते. कारण पुजारी मोठे नियम निष्ठेचे, मंत्रशास्त्रवेत्ते असा प्रचार झाला होता. आता ते यक्षिणी विद्येने पीडित झाले, असे कळले असले तर त्यांची अब्रूच गेली असती. तोंड दाबून बुक्क्याचा मार अशा स्थितीत ते जगत होते.


आता या मूर्छित बैराग्याचे काय करायचे? तो मेला की जीवंत आहे? याचा निर्णय घेऊन त्याची दहन क्रिया करावी असे ठरले. ही गोष्ट बापन्नाचार्यापर्यंत पोहोचली. बापन्नाचार्यांनी त्याला तपासून सांगितले ‘‘हा मेला तर नाहीच, पण ही मूर्छाही नाही, ही एक प्रकारची समाधी स्थिती आहे.'' बापन्नाचार्यांचे न ऐकता याचे दहन केल्यास यक्षिणी विद्येचा प्रभाव नाहीसा होईल, असे काही पुजा-यांना वाटले. तर काही पुजारी म्हणाले “यांचे दहन केल्यास या बैराग्यांच्या शक्ती प्रसारीत होऊन जास्त उपद्रवी ठरेल.'' केवळ श्रीपादांच्या संकल्पामुळेच माझ्या शरीराचे दहन झाले नाही.


आठ दिवसानंतर मी शुद्धीवर आलो. श्रीपादांनी आपला दिव्य हस्त माझ्या मस्तकावर ठेऊन मला आशीर्वाद दिला. पण एकही ब्राह्मण मला भिक्षा देत नसे. पीठिकापुरातील गौळी वाड्यात माझी राहण्याची व भिक्षेची सोय केली गेली. मी जातिभेद मानत नसल्यामुळे सगळे गौळी मला आप्तबांधवाप्रमाणे वाटत होता. तिथल्या एका गवळ्याच्या मुलीचे नाव लक्ष्मी होते. तिचा नवरा तिला मोठ्या प्रेमाने वागवत असे. तो गवळ्यांचा प्रमुख होता. तो गौळी वाड्यातले तंटेबखेडे सोडवायचा, न्याय निवाडा करायचा. वयाने लहान असला तरी विद्यावंत असल्यामुळे सर्वलोक त्याला मोठा मान देत असत. तो मालमत्तेचे व्यवहार पण सांभाळत असे. त्याची धर्मपत्नी लक्ष्मीही मोठी पतिव्रता होती. पण चारपाच वर्षांपूर्वीच ती विधवा झाली होती.


श्रीपादांचे महात्म्य मी जाणून असल्यामुळे तिचा कुठल्याही प्रकारे श्रीपादांशी संबंध आला, तर तिचे कल्याण होईल, असे मी तिला सांगत असे. तसा योग लगेच आला. वेंकटप्पण्या श्रेष्ठींच्या घरची गाय आटली होती. त्यामुळे श्रेष्ठींकडे दूध द्यायला लक्ष्मी जायची.


श्रीपादांचे श्रेष्ठींकडे सतत जाणे येणे होतेच. श्रीपाद मागो वा न मागो, वेंकटसुब्बम्मा श्रीपादांना गरम दूध, साय, लोणी पण द्यायच्या. लक्ष्मी त्यांच्याकडे दूध देऊ लागल्यापासून, श्रीपादांची भूक वाढू लागली. ते जास्त दूध मागू लागले. वेंकटसुब्बम्मांनी लक्ष्मीला आणखी जास्त दूध द्यायला सांगितले. जास्त दूध दिले तर घरी दूध कमी पडे. ताकात सुद्धा जास्त पाणी टाकून प्यावे लागे. पण त्यागमूर्ती लक्ष्मी आपल्या वाटेचे दूधही श्रेष्ठींकडे नेऊन देत असे.


इकडे देवळातल्या पूजा दहा दिवस चालत राहिल्या. ब्राह्मणांना भरपूर संभावना मिळत होती. पण धन घरात राहत नव्हते. चांगले खाऊन पिऊन देखील ब्राह्मण धडधाकट होण्याऐवजी दुर्बल होऊ लागले.


पुराण पंडित कथा


एक दिवस पीठिकापुरात पुराण सांगणारा व प्रवचन करणारा एक पंडित आला. कुक्कुटेश्वराच्या देवळाच्या प्रांगणात पुराण प्रवचानाचे आयोजन केले होते. गावातल्या ब्राह्मणांनी सांगितले, “पुराण वगैरे आमच्यासारख्या विद्वान ब्राह्मणांसाठी नसते. आम्हाला सर्व पुराण माहीत आहे. पुराण शूद्रांसाठी असते. पुराण पंडिताला बापन्नार्य श्रेष्ठी व वर्मांनी पैसे द्यावे. सर्व शूद्रांना पुराण श्रवणासाठी अनुमती दिली गेली. तसेच शूद्रांनी पुराण पंडिताला दक्षिणा द्यावी असेही सांगितले. काही ब्राह्मणांनी तर अशी सूचना केली, की पुराण पंडिताला जी संभावना मिळेल, त्यातली अर्धी ब्राह्मण परिषदेला द्यावी व अर्धी पुराण पंडिताला द्यावी. त्यावर बापन्नार्य म्हणाले, “यालाच “मुष्टिलो मुष्टि वीर मुष्टि म्हणतात. ही तेलुगुतली म्हण आहे. भिका-याला भीक मागणे. तुम्ही पुराण श्रवण करणार नाही म्हणता, अन् मेहनत करून प्रवचन देणा-याची मेहनतीची कमाई हडप करता? तुम्ही तुमचे वर्तन सुधारले नाहीत, तर भविष्यात कालपुरुषाकडून कठोर शिक्षा भोगावी लागले.'


पुराण पंडितांच्या भोजनाची सोय बापन्नार्यांकडे केली होती. प्रवचनाच्या आधी लक्ष्मी दूध गरम करून पंडिताला द्यायची. ते दूध पिऊन पंडित प्रवचनास सुरुवात करीत. श्रीपाद श्रीवल्लभ सर्वांच्या हृदयात राहत असल्यामुळे, त्यांना ठाऊक नाही, अशी कुठलीच गोष्ट नाही. पुराण पंडित ज्ञानी व योगी सुद्धा होता. आपल्या योगशक्तीमुळे इतर रूपात असलेले, स्वतःच्या आत्म्याचे रूप तो ओळखू शकत होता. त्या रूपातले चैतन्य तो स्वतःत आकर्षित करू शके.


त्या गावातील एका ब्राह्मण जमीनदाराच्या घरातील चार पाच महिन्याच्या बाळामध्ये, त्याला त्याचा आत्मा दिसला. दूध देणाच्या लक्ष्मीकडे त्याने योग दृष्टीने बघितले तेव्हा त्याच्या लक्षात आले की, हा बालकच लक्ष्मीचा पुढच्या जन्मातील पती होणार आहे. आत्म्याचे पुरुष शक्ती स्वरूप मूल तत्वात म्हणजे त्या पंडितात आधीच एकत्रित झाले होते. पण त्याच्या स्त्री शक्ती स्वरूपाचे मूलतत्व लक्ष्मी आहे, हे त्याला कळले. त्याच्यातले स्त्री तत्व लक्ष्मीत विलीन झाले आहे, हेही त्याला कळले.


लक्ष्मीला तिच्या नवच्याबद्दल फार प्रेम होते. पतीचे चैतन्य पूर्व शरीर सोडून आले की नाही, हे तिला माहीत नव्हते. अनेकदा तिचा पती तिच्या सोबत उभा आहे असे तिला जाणवत असे. वैतरणी नदी तरून जायला गोदान करावे लागते. त्या गोमातेने तिच्या पतीला वैतरणेच्या पार केले व तीच गोमाता भूलोकावर गाईच्या रूपाने जन्मली असे तिला कळले, कारण तिला गोमातेचे दर्शन झाले होते. वैतरणी पार केल्यानंतर लक्ष्मीच्या पतीचे चैतन्य, मूलतत्व असलेल्या पुराण पंडितात विलीन झाले आहे, हे सर्वज्ञ श्रीपादांना ज्ञात होते.


तो पंडित पीठिकापुरातील कर्मऋणानुबंध पूर्ण करून, त्याचे इतर आत्मधारी रूपाचे कर्म योगशक्तीने हरण करून, परमेश्वराशी ऐक्य साधण्याचा निश्चय करून, पीठिकापुरात आला होता. त्याने परमेश्वराशी ऐक्य साधले असते तर ब्राह्मण जमीनदाराचे ते चार पाच महिन्याचे बालकही मेले असते. ते बालक लक्ष्मीचा पती होणार असल्यामुळे लक्ष्मी हा जन्म पूर्ण करून पुढचा जन्म घेईपर्यंत ते बालक अस्तित्वात राहिले नसते. त्यामुळे लक्ष्मीचा पुढचा जन्म ब्रह्मचारिणी होऊनच काढावा लागला असता. लक्ष्मीला पुन्हा जन्म घेण्याची तीव्र इच्छा होती. तिचा पुढचा जन्म सद्ब्राह्मणाच्या घरातच व्हायला हवा होता, तोवर जमिनदाराचा बालक, मोठा झाला पाहिजे. बिचारी लक्ष्मी भोळी आहे. तिच्या नकळत तिने अर्धनारीश्वर योग अनुष्ठान केले. ही सगळी श्रीपादांचीच लीला!


पुराण प्रवचनाचे नाटक संपले. पंडिताने शूद्रापासून संभावना स्वीकारली.लक्ष्मी शूद्रकुळात जन्मलेली. शूद्र संबंध स्वीकारल्यामुळे शूद्रांशी असलेले आपले कर्मबंध फिटले. असे पंडितांना वाटले. उरलेले कर्मबंध योगाग्नीत दग्ध करण्याचे ठरविले.


बापन्नार्यांकडे भोजन केल्याने ब्राह्मण जन्मासंबंधीचे ऋणानुबंध मिटेल, असे त्या पंडिताला वाटले. पंडिताला संभावना देण्यासाठी बापन्नार्य आत गेले. इतक्यात लक्ष्मी बापन्नार्यांकडे आली. तिची गाय व्याली होती, म्हणून ती गाईचा चीक द्यायला आली होती. तिची श्रीपादांवर मोठी श्रद्धा व भक्ती होती.


बापन्नार्यांनी पंडिताला संभावना दिल्यानंतर पंडित निरोप घेऊन जाऊ लागला. श्रीपाद म्हणाले, “सगळ्यांनी तुला निरोप दिला असेल, पण दोघे जण तुला निरोप देणार नाहीत. मला हिशोब चांगला करता येतो मी पक्का व्यापारी आहे. उधार किती? फेडले किती? या सर्वांचा पूर्ण हिशोब केल्याशिवाय, तुला पीठिकापुरातून हालता येणार नाही.''


ब्राह्मण थोडा हडबडला! श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात् दत्तावतार आहे, हे त्याने पूर्वी ऐकले होते. श्रीपाद म्हणाले, “बेटा! ही लक्ष्मी भोळी आहे. ही आता काही वर्षच जगणार. ही मरण पावल्यावर हिची गत काय होईल? ज्ञानरूपात तू ब्राह्मण व अज्ञान रूपात गवळी म्हणून जन्मलास. तुझ्या गवळी रूपी चैतन्याला वैतरणी पार करवून गोमाता स्वेच्छेने या भूलोकात परत आली. लक्ष्मीने आपल्या प्रेमाग्नीत पतीचे चैतन्य आपल्या जवळच ठेवले. गवळी वनीतेच्या रूपातील हे चैतन्य, काही वर्षानंतर शरीरपात झाल्यावर, ब्राह्मण चैतन्यात बदलेल का? ही गवळी वनितारूपातली ब्राह्मणी आहे. तू ब्राह्मण रूपातला गवळी आहेस. तुमचे कर्म संबंध मला चांगले माहीत आहे. भविष्यात ब्राह्मणी रूपातल्या लक्ष्मीला पद्मावती स्वरूप मानून तिला सोन्याचे कुंकू लावून आशीर्वाद देईन. हिच्यासाठी मंगळसूत्राची निर्मिती करून हिरण्यलोकात जपून ठेवीन. सोन्याशी संबंध तुटला की पत्नीचा पतीशी संबंध तुटतो. जमीनदाराचा तो चारपाच महिन्याचा बाळ मोठा होणार. भविष्यात लक्ष्मी ब्राह्मण कन्या म्हणून जन्माला येईल व त्याची पत्नी होईल. श्रीपादांची लीला मोठी अद्भूत आहे !


॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥